माझ्या असंख्य स्वप्नांच्या यादीतली ही आणखीन दोन स्वप्नं !
स्वप्न नं १ – चाऊल खादयाला जवळून बघणं आणि
स्वप्न नं २ – खांदेरीला चुलीवर बनवलेलं माश्याचं जेवण जेवणं.
खरतर ही दोन्हीही स्वप्न एकाच दिवशी पूर्ण होतील असं स्वप्नातही वाटलं नव्हतं.
पण ती एकाच दिवशी पूर्ण होण्या मागचा खरा सूत्रधार होता पराग दामले. पराग म्हणजे माझा बालमित्र. तसे वया मधे थोडे अंतर जरी असले तरीही आवडी निवडी बऱ्याच कॉमन असल्याने आम्ही लहानपणा पासूनच चांगले मित्रं होतो. दोघेही डोंबिवलीतलेच, एकाच बिल्डिंग मधले आणि एकाच शाळे मधले देखील. परागने डोंबिवली सोडल्यावर मात्र आमचा संपर्क राहिला नव्हता. पण बरेच वर्षांनी आम्ही परत संपर्कात आलो कारण पक्षी निरीक्षणासाठी म्हणून जेव्हा जेव्हा पराग आक्षीला म्हणजे माझ्या गावाला यायचा तेव्हा प्रत्येक वेळी त्याचा मुक्काम आमच्याच हॉटेल मधे म्हणजे Jaswand Holidays मधे असायचा. (www.jaswandholidays.com).
पराग एक उत्कृष्ठ पक्षी निरीक्षक असण्या बरोबरच एक चांगला फोटोग्राफर देखील आहे पण त्याही पेक्षा मला महत्वाचं वाटत ते म्हणजे तो एक Bird lover, एक पक्षी प्रेमी आहे. (Please refer https://www.facebook.com/paragarundamle). पक्षी प्रेमाच्या ह्या छंदा मुळे पराग असाच बरेच ठिकाणी फिरत असतो त्यातलीच ही एक खांदेरीची ट्रीप. परागच्या खांदेरी ट्रीप बद्दल लकीली मला कळले, मला वेळही होता आणि पक्षी निरीक्षणाबद्दल कुतूहल देखील होते त्या मुळे मी पण त्यांना जॉईन झालो.

खांदेरीला जातानाच चाउल खादयाला देखिल भेट दयायचे आम्ही ठरवले. चाउल खादया म्हणजे अलिबागच्या समुद्रा मधील म्हणजेच अरेबिअन-सी मधील एक दिपस्तंभ (Light House). आक्षीच्या किनाऱ्या वरून अगदी बिंदुवत दिसणाऱ्या ह्या चाउल खादयाच्या दीपस्तंभा बद्दल मनात गेली अनेक वर्ष कुतूहल होतं. समुद्र खवळलेला असताना त्याच्या वर आपटणाऱ्या लाटा लांबून देखिल दिसत असत, मग त्या प्रत्यक्षात किती मोठया असतील? ह्या विचाराने थोडी भीती पण वाटत असे. ह्या उलट कधी कधी असंही वाटे की भर समुद्रात एखादया चांदण्या रात्री चाउल खादयावरती एखादी आख्खी रात्र काढायला मिळाली तर किती मज्जा येईल. (सांगितलं तर खोट वाटेल पण मी एकदा चक्क गेट वे ऑफ इंडियाच्या टेरेस वरती पण जाऊन आलोय, पण त्या बद्दल पुन्हा कधीतरी सांगीन) आणि आज चक्क त्याला जवळून पहायची संधी अचानक चालून यावी हे देखिल माझ्या साठी काही कमी नव्हते. त्याचं नाव चाउल खादया पडण्या मागे एक मजेदार गोष्ट आहे. पूर्वी म्हणजे जवळ पास १००-१५० वर्षापूर्वी सर्व जीवनावश्यक वस्तूंचा व्यापार मुख्यता समुद्रातून चालत असे. तांदुळाने भरलेले असेच एक गलबत अलिबाग जवळील समुद्रातल्या एका मोठया खडकावर आदळून फुटल. तांदुळाला हिंदीत चावल म्हणतात. चावलचा अपभ्रौंश चाउल, त्यामुळे चाउल खाणाऱ्या ह्याच त्या दगडावर उभारलेल्या दिपस्तंभाला चाउल खादयाचा दीपस्तंभ म्हणून ओळखले जाते.

खांदेरी बेट

खांदेरी बद्दल बरेच जणांनी आधी ऐकलं किंवा वाचलं असेल. खांदेरी हे देखिल अरबी समुद्रातीलच एक बेट, सध्या त्याचे कान्होजी आंग्रे द्वीप (kanhoji Angre Island) असे नामकरण करण्यात आले आहे. खांदेरीला देखिल एक दिपस्तंभ आहे. आणि त्या व्यतिरिक्त येथे कोळी लोकांचे अतिशय जागृत असे समजले जाणारे वेताळाचे मंदिर देखील आहे. दर वर्षी भरणाऱ्या खांदेरीच्या यात्रेला कोळी लोकं मोठ्या संख्येने इथे भेट देतात.
Plan असा होता की पराग सकाळी ४ वाजता मला माझ्या घरून म्हणजे ठाण्यावरून पीक-अप करणार, ७ वाजे पर्यंत आम्ही आक्षी गाठणार आणि बरोब्बर ७.३० वाजता समुद्र प्रवास सुरु करणार. कमी अधिक फरकाने म्हणजे शेवटी ८ ते ८.१५ वाजता आम्ही finally किनारा सोडला. ह्या समुद्र सफरी मागचा किंवा ह्या sea expedition मागचा परागचा खरा उद्देश Deep समुद्रा मध्ये आढळणाऱ्या स्कुआ (skua) ह्या सी-गल्सच्याच एका खास जातीचा अभ्यास आणि त्यांचे फोटो काढणे हा होता.
बोटीत सगळे मिळुन आम्ही एकूण ८ जणं होतो. बोटीचा मालक नाखवा, त्याचे तीन helper भैये आणि आम्ही ५ फोटोग्राफर्स. गंमत म्हणजे आम्ही पाचही जणं फोटोग्राफर्स असल्याने in other way we were selling in a same boat. अर्थात माझ्या साठी ह्या ट्रीप मधले point of attractions कोळी लोकांचे समुद्रातली Life आणि त्यांचे food शूट करणे हे होते. मच्छीमारी साठी जाणाऱ्या प्रत्येक मोठया गलबता मध्ये बर्फाची कोल्ड स्टोरेजेस असतात. गलबताच्या साईज प्रमाणे ३ ते ४ किंवा ७ ते ८ दिवस टिकेल इतका बर्फ घेऊन ती समुद्रात मच्छीमारी साठी जातात आणि एक Certain Quantity मिळे पर्यंत किनाऱ्यावर परतत नाहीत.

रात्रंदिवस समुद्रातच राहण्याच हेच थ्रिल कुठेतरी मला अनुभवायचं आणि Document करायचं होतं. अर्थात एका ट्रीप मध्ये आणि ते पण काही तासांच्याच हे सर्व अनुभवणे कितीही जरी अशक्य असलं तरी पण कुठेतरी सुरवात तितकीच महत्वाची आहे.
बोटीने किनारा सोडला आणि नाखवा ने जवळच उभ्या असलेल्या त्यांच्याच एका नुकत्याच फिशींग करून आलेल्या बोटीतून जेवताना लागतील म्हणून ३-४ चांगले मोठाले मासे घेतले. आमच्या plan प्रमाणे पहिल्यांदी चाउल खादया व नंतर दुपारपर्यंत खांदेरी बेट असा program ठरलेला. चाउल खादया जवळ पोहोचायला आम्हाला जवळ जवळ दिड तास लागला काही वेळ तिथे घालवून मग आम्ही बोट खांदेरीच्या दिशेने वळवली. पुढे हळू हळू परागला expected असलेले पक्षांचे थवे दिसू लागले. दुर्बिणीतून बघितल्या वर अंदाज आला की हेच ते हवे असलेले पक्षी असू शकतील. बोट त्यांच्या जवळ जवळ जाऊ लागली आणि हळू हळू खात्री पटली. दुर्बिणी, कॅमेरे त्यांच्या वर रोखण्यात आले, बोटीवरील सर्व bird lovers मध्ये उत्साहाची लाट पसरली, कॅमेऱ्यांचा क्लिक क्लिकाट सुरू झाला, अनेक actions freeze झाल्या. अर्धा ते पाउण तास सर्व जण भारावून तो पक्षांचा नाच अनुभवत होते. ज्या क्षणांची अपेक्षा होती ते क्षण कॅमेरात एक मागून एक बंदिस्त होत होते. नाखवा ने सांगितल्या प्रमाणे आजूबाजूला मासे काढत असलेल्या बऱ्याच मच्छीमार बोटींमुळे हा अनुभव घेता आला. माझ्यासाठी तरी हा एक खूप वेगळा आणि exciting अनुभव होता.
ज्या सीगल्स च्या शोधात आम्ही निघालेलो त्या सीगल्सच्या प्रजाती खोल समुद्रातच राहतात आणि मासे पकडणाऱ्या बोटींच्या आजूबाजूला आपले भक्ष/अन्न पकडून आपला उदरनिर्वाह करतात). त्यात पण दोन जातीचे सीगल्स असतात. त्यातील एका जातीचे सीगल्स म्हणजे Brown Headed Seagulls जे स्वतः कष्ट करून आपलं अन्न मिळवतात, त्यांना लोकल भाषेत केट म्हणतात, (कष्ट करणारे ते केट.) तर दुसऱ्या जातीचे सीगल्स म्हणजे Arctic Skuas जे  स्वतः कष्ट वगैरे न करता ह्यांनी कष्ट करून पकडलेले मासे दादागीरीने त्रास देऊन देऊन त्यांच्या तोंडातून चोरून / हिसकावून खातात त्यामुळे लोकल भाषेत ह्या जातीच्या सीगल्स ना चीटूक (चोर) म्हणतात. पक्षांमध्ये पण Politicians असतात ह्याचे हे एक अगदी जिवंत उदाहरण.कष्ट करून पैसे मिळवणाऱ्या सामान्य नागरिकांकडून टोल वसूल करण्या सारखाच काहीसा हा प्रकार. 
Arctic Skuas च्या पण दोन जाती असतात एक म्हणजे आर्क्टिक पेल मॉर्फ स्कुआ (Arctic Pale Morph Skua) ज्यांची पूर्ण body डार्क ब्राऊन आणि फक्त पोटाचा भाग पांढरा असतो. आणि दुसरे आर्क्टिक डार्क मॉर्फ स्कुआ (Arctic dark Morph skua ) ज्यांची संपूर्ण body डार्क ब्राऊन असते.
ह्या अविस्मरणीय अनुभावानंतर आम्ही खांदेरीच्या दिशेने प्रवास सुरु केला. खांदेरीचे बेट समोरच जरी दिसत असले तरीही नाखवाच्या म्हणण्या प्रमाणे पोहोचायला किमान दिड ते दोन तास लागणार होते. त्यामुळे चिवडा,फरसाण, बिस्किटे, फळे ह्यांची देवाण घेवाण सुरु झाली.

 

 

 

 

दोन तास कसे गेले कळल देखिल नाही. खांदेरी बेट जस जसे जवळ येत होते तसतशी बोट किनाऱ्यावर आपटून परत येणाऱ्या लाटांमुळे खुप हेलकावे खायला लागली होती. वारा देखिल छान वाहत होता. वाऱ्याला कापत बोटीला वळवणे खूप कठीण जाते. शेवटी हळू हळू त्या दिशेला बोट वळवून नांगर टाकण्यात आला आणि बऱ्याच प्रयत्नां नंतर आम्ही एकदा खांदेरीच्या किनाऱ्याला लागलो.
पोहोचे पोहोचे पर्यंत दुपारचे पावणे तीन वाजलेले. आता आमच्या हातात जेमतेम दिड तास होता. त्यात आम्हाला जेवण बनवून, जेवून व जमल्यास थोडा आराम करून निघायचे होते. नाखवा आणि त्याच्या पोरांनी भरभर कामाला सुरवात केली. Non-Veg मेनू मध्ये मासे आणि भरपूर भात व Veg मेनू मध्ये Sandwich, असा बेत होता. चूल पेटवली गेली. चुलीवर पहिल्यांदा भात चढला. भराभर मासे साफ करून त्याला मीठ मसाला लावण्यात आला. चुलीवरून भात उतरल्या उतरल्या पुढल्या २५-३० मिनीटात फिश फ्राय आणि फिश करी देखील तयार झाली. कांदा नाही, खोबऱ्याच वाटण नाही, लिंबू नाही की कसलाही ताम-झाम नाही. तिखट, मीठ, चिंच आणि थोडा मसाला आणि करी मध्ये मीठ मसाल्या व्यतिरिक्त फक्त थोडीशी लसूण That’s all. Hardly ३५ ते ४० मिनीटात नऊ-दहा जणांचे जेवण तयार झाले.हे खरे फास्ट फूड आणि रस्टिक देखील.
रात्रंदिवस भात, फिश फ्राय, आणि माश्याच कालवण हेच अन्न. त्या दिवशी ते लोकं बगा नावाचा मासा तळत होते. त्यांनी तर माश्याला फक्त मीठ आणि हळदच लावून मासे direct तळायला टाकले. कोळी लोकांच्या बोटीवर आजकाल ८०% भैय्येच काम करतात, त्यातील एक जण मला म्हणाला, ” देखो साब पेट के लीये क्या क्या करना पडता है”. मी म्हटलं, “लेकीन मजा आता है ना?” तर हसायला लागला. मी बोलत होतो ते भैये कानपूरहून आलेले. घरापासून कुटुंबापासून इतके दिवस केवळ पोटासाठी लांब राहायचं म्हणजे कितीही जरी पोटासाठीच असलं तरीही खरतर खाऊचं काम नव्हत. मला त्यांनी प्रेमाने एक तळलेला माश्याचा तुकडा टेस्ट करायला दिला. माश्याच नाव बगा होतं मी मनात म्हटलं,”चला खाऊन बगा (वा)”.
नाखवा आणि त्याचा टीम ने बनवलेला फिश चा बेत पण अप्रतिम झालेला. Sorry! Sorry! अप्रतिम हा फारच सभ्य शब्द झाला. I guess रापचिक ठिक राहील. Let me repeat नाखवाने बनवलेला फिश चा बेत देखील
“फुल टू रापचिक” होता.
ओहटी चालू व्हायला अगदी अर्धा तासच उरला असल्याने, जेवण झाल्या झाल्या आम्हाला लगेचच wind up करण भाग होतं. कारण अजून अर्धा-पाऊण तास लेट म्हणजे परत भरती येई पर्यंत म्हणजे रात्री ८-९ पर्यंत थांबव लागणार. आमचं schedule अगदीच कट टू कट चाललेलं. अलिबागच्या किल्ल्याकडून आक्षीच्या खाडीत जाता येते पण भरती असतानाच. पोहोचे पोहोचे पर्यंत आम्हाला अगदी १०च मिनिट लेट झालेला पण तरीही किनाऱ्या लगतचे पाणी पूर्ण पणे ओसरले असल्याने शेवटी आम्हाला तिथेच म्हणजे अलिबाग किल्ल्या लगतच्या किनाऱ्यालाच बोट नांगरून चालत आक्षीला जावे लागले.
Well! that was also a different experience, कॅमेरा bags डोक्यावर घेऊन जाण्याची ही सर्वांचीच पहिलीच वेळ होती.

अखेर आम्ही सर्वजण भरलेल्या पोटांनी, आणि भरलेल्या CF Cards नी किनाऱ्यावर पोहोचलो. पण खरं सांगायचं तर पोटं जरी कितीही भरलेली असली तरीही मनं मात्र अजून भरायची बाकी होती.
अशा रीतीने सकाळी ४ वाजता सुरु झालेली समुद्रप्रवासाची ही कहाणी अखेर संध्याकाळी ६ला संपली.
हा समुद्रानुभव केवळ अविस्मरणीयच नाही तर रोमांचकारी देखील होता ह्यात मात्र वाद नाही.
Sea You then!